गेल्या वर्षी ‘१८ मे’ या दिवशी तौक्ते वादळाने सर्वत्र हाकार घातलेला होता. आपण ह्या चक्रीवादळाचे सर्वजण साक्षीदार आहोत आणि आपल्यास ठाऊक आहे की, काय दुश्य घडले होते. मुसळधार धो-धो पाऊस, समुद्रात मोठ-मोठ्या तुफानी लाटा, आणि जोरदार सुसाट्याचा वारा असे वाटले होते की, निसर्गराजा आपणांवर रागावलेला होता. अशा परिस्थितीत अलिबाग येथील एका विधवा आईची दोन मुले मासेमारीसाठी खोल सागरात गेलेली होती. सर्वजण गर्दीने समुद्र किनारावर बोटी परतण्याची वाट पाहत होते. अशाच या गर्दीत विधवा आई पहाटेपासून ते संध्याकाळ होईपर्यंत आपल्या दोन्ही मुलांची आतुरतेने वाट पाहत होती. माझी मुलं अजून का? येत नाहीत या शंकेने तिच्या हृदयात धक्का बसत होता. अशा या वातावरणामुळे माझ्या मुलांची होडी दिशाहीन, दिशाभूल किवा कुठेतरी भरकटली नसेल का? किनारा गाठायला अवघड जात असेल का? माझी मुलं चागली असतील ना? तिच्या मनात नको असलेले विचार खोळबत होते. या विचाराने चीतीत होऊन आपली मुलं सुखरूप किनाऱ्यावर यावी, त्यांना योग्य मार्ग मिळावा मुलांच्या दुखात पाठीराखी कुणीतरी असावे या हेतूने विधवा आईने तिच्या हृदयावर दगड ठेऊन स्वतःच्या झोपडीला आग लावली आणि स्वतःचे घर जाळून घेतले. जेणेकरून या झोपडीच्या जळत्या आगीने, उजेडाने, आणि प्रकाशाच्या साहायाने बोट सुखरूप पोहचेल, माझी मुलं घरी येतील आणि माझ्या दुखी मातेच्या विश्वासू लोकानो खरोखरच ह्या दोन्ही मुलांची होडी दिशाहीन झाली होती. त्यांना मार्ग मिळत नव्हता. परंतु जेव्हा ह्या मुलांनी हि आग पाहिली तेव्हा त्यांना समजे की, येथे किनारा आहे व आपण आणि आपली बोट रात्रीसाठी ठेऊ शकतो. ह्या विधवा बाईने आपले निवासस्थान उध्वस्त केले केवळ तिची दोन्ही मुलं किनारावर सुखरूप येण्यासाठी. विधवा आई ही जणू दीपस्तंभ झाली.
ख्रिस्ताच्या आईच्या चरणाजवळ नतमस्तक झालेल्या माझ्या पवित्र मरीयेच्या
भक्तांनो, गेल्या दोन हजार
वर्षामध्ये येशूची आई पवित्र मरिया हिला अनेक नावांनी संबोधण्यात आलेले आहे.
आजाऱ्याची आई, प्रवासाची राणी, दु:खीतांची सांत्वन करणारी आई, कुटुंबाची राणी इत्यादी कितीतरी शीर्षकाने ओळखले गेले आहे. आज जगभरात
होण्याऱ्या ह्या नवदिन भक्तीमध्ये पवित्र मरीयेच्या जीवनावर विचारविनिमय करीत
असताना. ह्या नवदिन भक्तीद्रारे आपण ख्रिस्ताच्या जवळ येत असतो. तसेच ह्या
नोव्हेनाच्या दिवशी आपल्या वसई धर्मप्रांताने वेगवेगळे विषय देऊन आपले देऊळ
मातेवरील नाते घनिष्ठ कारणाचा प्रयत्न करीत आहेत.
माझ्या मरीयेच्या भक्तगणांनो, असं म्हणतात, ज्याच्या पायाला ठेच लागते त्यालाच वेदनांची खरी
जाणीव होते. उत्तम शुक्रवारी जेव्हा ख्रिस्त मरण पावला तेव्हा सर्व शिष्य घाबरून पळून
गेले होते. त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दु:खी खिन्न होऊन
शिष्य घरात लपून बसले होते. अशावेळी ह्या दु:खी शिष्यांचे सांत्वन किवा धीर
देण्यासाठी पवित्र मरिया पुढे आली. स्वतः दुखी असताना सुद्धा ती त्यांना साथ
देण्यासाठी आली. ‘माया मंदिर हलले लागे कळस फुटाया आज खायळ पक्षी मी जाई पिल्याना भेटाया!’
स्वतः दुखी आणि घायाळ असताना
सुद्धा इतरांच्या दु:खात सहभगी झाली. ज्याप्रमाणे कोंबडी आपल्या लहान पिल्याना
कावळाच्या तावडीतून बचाव करून त्यांना तिच्या पखाखाली लपवत होती. तशाचप्रकारचे
कार्य पवित्र मातेने केले. सर्वांना तिच्या मायेच्या पदरामधे बाधून ठेवले.
मरिया मातेची मानवाविषयीची आस्था जगाविषयी कळकळ तिच्या अनेक
दर्शनांमधून व्यक्त झालेली आहे. मरिया माता आपल्या सर्वांची आई आहे कारण येशूने
क्रुसावरून “पहा, ही तुझी आई” हे आपल्यापैकी प्रत्येकाला
उदेशून काढलेले उद्गार आपल्या मरीयामातेबरोबरचे नाते व्यक्त करते. आपण पापी आहोत,
दुर्बल आहोत, पापाची निरनिराळ्याप्रकारे
आपल्या जीवनात लागत असते, हे मरिया माता फार चांगल्या रीतीने, आईच्या हृदयाने समजू शकते. तिच्या पुत्राने तारणकार्य केले
आहे ते प्रत्येक श्रद्धावंताना मिळावे आणि प्रत्येक श्रद्धावंत पापांच्या
कलंकापासून मुक्त व्हावा, हीच तिची मनोभावे इच्छा आहे. म्हणून मरिया माता अखंडितपणे मध्यस्थी करत असते.
जी आई परिशुद्ध आहे, निष्कलंक आहे, पापाच्या कलंकापासून पूर्णपणे मुक्त आहे ती आई आपली लेकरेसुद्धा तशी शुद्ध,
पवित्र, पापमुक्त व्हावीत अशी इच्छा
नाही का बाळगणार?
पवित्र मरीयेने कितीतरी दु:खी-दीनांना प्रसगांतून मुक्त
केलेले आहे. अंधाराच्या वाटेवर तो मार्गदर्शक तारा बनलेली आहे. तिच्याकडे
पसरविलेली भक्तांनी झोळी तिने भरून काढलेली आहे. तिच्या पुत्राकडे ती मध्यस्थीची
याचना करीत आसते. जर तुम्हांला इतरांच्या उपयोगी पडायचं असेल तर प्रथम स्वतःसाठी
त्रास घेण्याची सवय लावा. इतरांना प्रकाश देण्यासाठी स्वतःच्या हृद्रयात ज्योत
प्रज्वलित ठेवा.
अन्न, वस्त्र व निवारा ह्या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. ह्या मुलभूत गरजा
पुरविण्यासाठी माणूस जीवापाड प्रयत्त्न करत असतो. देवाने ह्या आपल्या गरजा जाणून
घेऊन त्या पूर्णतेस नेण्याचे काम आपल्या प्रत्येकाच्या हाती दिले आहे. ते
आई-वडिलांपासून ते थोरापर्यंत आणि लहानापासून तर मोठ्यापर्यंत ह्या सर्वांचे आहे.
अन्न,वस्त्र, व निवारा विकत घेत असताना.
आपले आई-वडील आपल्याला योग्य आणि उत्तम खाण्यासाठी देत असतात. आईच्या जेवणाची चव आपल्या
जिभेला कळलेली असते. परिस्थिती बिकट असली तरी देखील आई-वडील आपल्या लेकरांना जेवण
मात्र कमी पडू देत नाही. ज्यांनी आपल्या पोटची भूक मारून आपल्याला जेवून तृप्त
केले, कधी त्यांना,
आई तू जेवलीस का? बाबा तुम्ही जेवलात का?
हे विचारले आहे का? प्रत्येक अंधाऱ्या
रात्रीनंतर पहाट होते तसेच दुखनतर आनदाचा क्षण येत असतो. आपल्या वाटयाला आलेल्या
दुखाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. दुखामुळे परिवर्तनाची दिशा
सापडते व दुखामुलेच ख्रिस्ताच्या जवळ जात असतो.
प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपणास ठाऊक आहे की, पवित्र मरीयेने देवाच्या इच्छेला “होय” म्हणाली. कारण तिला माहित होते की ही देवाची इच्छा
आहे. जेव्हा देवाची इच्छा असते, तेव्हा आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो. दुसरीकडे, हव्वा, सर्व सजीवांची आई, देवाच्या इच्छेला "नाही" म्हणाली ज्यामुळे सर्व
मानवजातीवर आपत्ती, शोकांतिका, संकटे आणि मृत्यू आला. त्याचा परिणाम गुलामगिरी आणि बंदिवासात झाला. पवित्र
मरीया, नवीन हव्वा,
"होय" म्हणाली
आणि आपल्या सर्वांसाठी तारण आणि जीवन आणले. अशाप्रकारे, पवित्र मरीयेची देखील धार्मिक विधीमध्ये विशेष
भूमिका आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. पवित्र मरीयेने होय म्हटले आणि तारणाच्या
इतिहासात नवीन सुधारणा घडून आल्या.
आज आपण पवित्र मरीयेला बाजूला ठेवू शकत नाही. मुलाशिवाय आई
पूर्ण होत नाही. देवाची आई होण्यात काय मोठेपण! पण तो मोठेपण तिच्या डोक्यात नाही
तर तिच्या हृदयात जतन केला. ती परमेश्वराची महती सांगते. पवित्र मरीयेची महानता
येशूशी तिच्या जवळीकतेमध्ये आहे. नाझरेथ येथील घोषणेपासून ते कॅल्व्हरी येथील
वधस्तंभापर्यंत मरिया येशूच्या पाठीशी उभी होती. जे ख्रिस्त प्रकाश असेल तर मरिया दिवा स्टँड आहे. ख्रिस्त
जर दुपारचा दिवस असेल; तर मरिया सकाळचा तारा. ख्र्सित जीवनाची भाकर; मरिया गहू. ख्र्सित गुरु आहे; मरिया पहिली शिष्य. तो उद्धारकर्ता आहे; मरिया पहिली सुटका करणारी
आई. जीवनाच्या तुफान समुद्रात तो आपला नांगर आहे; मरिया
महासागरात रक्षणाचा तारा आहे. तो मार्ग आहे; मरिया स्वर्गाचे द्वार.
No comments:
Post a Comment